माझा प्रभाग म्हणजे केवळ नकाशावरची जागा नाही, तर इथली माणसं माझी आपली आहेत,” असं सांगत कोमल सारंग नवले यांनी नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं हेच आपलं खरं कर्तव्य असल्याचं मत व्यक्त केलं.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांपासून ते सामान्य माणसाच्या आवाजापर्यंत प्रत्येक प्रश्न आपलाच समजून त्यासाठी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नेतृत्व म्हणजे खुर्चीवर बसणं नव्हे, तर लोकांसोबत चालणं, या विचारांवर विश्वास ठेवून आपण सामाजिक कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि जनतेशी थेट संवाद हेच आपल्या कार्याची ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त करत कोमल सारंग नवले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे.


दरम्यान, त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३४ मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
